Lokmat Sport Update | दक्षिण आफ्रिकेत Jhulan Goswami चा बोलबाला | New Record | Lokmat Marathi News

2021-09-13 0

भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एकदिवसीय कारकिर्दीतील २०० बळींचा टप्पा पार केला आहे. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलनने एकदिवसीय क्रिकेटमधला २०० वा बळी गाठला. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० बळी घेत विक्रमी कामगिरी करणारी झुलन गोस्वामी पहिली खेळाडू ठरली आहे.२०११ साली न्यूझीलंड विरुद्ध खेळताना झुलनने ३२ धावांत ६ बळी घेतले होते. ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. या ऐतिहासीक कामगिरीनंतर अनेकांनी झुलन गोस्वामीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires